शिवाजीराव रामोजीराव गायकवाड ऊर्फ रजनीकांत हे एक बहुभाषिक भारतीय अभिनेते.त्यांचे प्रमुख क्षेत्र तमिऴ चित्रपट असले तरी त्यांनी हिंदी भाषा, कन्नड, तेलुगू, बंगाली तसेच इंग्लिश चित्रपटांत अभिनय केला आहे. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'शिवाजी द बॉस' या तमिऴ चित्रपटानंतर रजनीकांत हे भारतातील आणि आशिया खंडातील सर्वाधिक मानधन मिळविणारे कलाकार ठरले. या चित्रपटाकरिता त्यांना तब्बल २६ कोटी रुपये मानधन देण्यात आले होते. रजनीकांत हे भारताबाहेरही अनेक देशांत लोकप्रिय अभिनेते आहेत, तसेच जगातील सर्वाधिक मोठा चाहता वर्ग असलेला अभिनेता म्हणून गिनिज बुक मध्ये त्यांचे नाव नोंदले गेले आहे. भारताखालोखाल जपान मध्येही त्यांचे चित्रपट लोकप्रिय आहेत. दक्षिणपूर्व आशिया आणि जपान मध्ये रजनीकांत ह्यांचा मोठा चाहतावर्ग आहे आणि त्यांचे फॅनक्लब्सही आहेत. Read More
रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर दाक्षिणी अभिनेते राजकीय पटलावर सक्रिय झाल्याने तमिळनाडूच्या राजकारणातील रंगत वाढली असली तरी निवडणुकीत रजनीकांत यांच्याशी युती करण्याची शक्यता कमल हसन यांनी फेटाळली आहे. ...
जगातील जवळपास 200 देशांपैकी भारताच्या स्थितीबाबत बोलायचं झाल्यास जेव्हा सुपरस्टार रजनीकांत भारताचे पंतप्रधान बनतील तेव्हाच भारत अमेरिकेप्रमाणे महाशक्ती बनेल ...
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी नवीन राजकीय पक्ष स्थापन करून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागा लढविण्याची घोषणा केल्याने त्यांच्या चाहत्यांत उत्साह असला ...
रजनीकांत यांच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा या घोषणेशी निकटचा संबंध असून त्यांच्या सल्ल्यानेच रजनीकांत यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चाही राजकीय वतुर्ळात सुरू झाली ...
'मर्सल' या तमिळ सिनेमावरुन सुरू असलेला वाद एकीकडे संपण्याचा नाव घेत नाहीय, तर दुसरीकडे या सिनेमाचं केवळ प्रेक्षकांकडूनच नाही तर दिग्गजांकडूनही प्रचंड कौतुक केले जात आहे. ...