राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
गणेशोत्सवानंतर राज ठाकरे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनसेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. ...
जवळपास १ तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मी राज ठाकरेंशी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहे. त्यामुळे त्याचा राजकीय अर्थ काढू नये असं बावनकुळेंनी सांगितले. ...
पक्ष वाढवण्यावर कुणाचा आक्षेप नाही. परंतु अडीच वर्ष कुठे गेले होते असा सवाल महाराष्ट्रातील जनता उद्धव ठाकरे, शरद पवारांना करणार आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. ...
भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 'शिवतीर्थ'वर भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि भाजपा यांची जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे. ...