चाऱ्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरे सांभाळणेही परवडेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वैरणीसाठी १०० टक्के अनुदान मिळत असल्याने ज्यांच्याकडे पाणी आहे, त्यांनी चारा पिकवून पैसा कमविण्याची संधीही आहे. ...
विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप वेगाने सुरु असून आतापर्यंत ४७ लाख ६३ हजार नुकसान भरपाई अर्जांना मंजुरी मिळाली असून १ हजार ९५४ कोटी रुपये वाटप होणार आहेत. यापैकी ९६५ कोटी रक्कम वितरीत करण्यात आली असून उर्वरित रक्कम वितरीत करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ...
यंदा पर्जन्यमान कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मर्यादित ओलीवर गहू पिकाची पेरणी केली आहे. पाण्याची उपलब्धता होईल याची शाश्वतता नाही. अशावेळी जिरायत/मर्यादित सिंचनाखालील गहू पिकात जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी काय उपाय करणे आवश्यक आहे ते पाहूया ...
खरिप हंगामात पावसाची अनिश्चितता तसेच पिकात होणारा अमर्याद गवताचा प्रादुर्भाव यामुळे मका पिकाचे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. मात्र खरिप हंगामात लागवड केलेल्या पिकाच्या तुलनेत रब्बी मक्याचे उत्पादन जवळपास दुप्पट मिळते. ...
नोव्हेंबर महिन्यात रब्बीच्या बहुतांशी पेरणीची कामे होत असताना यंदा मात्र केवळ २८ टक्क्यांपर्यंतच पेरणी झाल्याने आगामी काळात उत्पादन घटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ...