राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
भारताने चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली ते प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली. निश्चितच आपल्या संघाने केलेल्या या विश्वविजयी कामगिरीवर द्रविड प्रचंड आनंदी आणि समाधानी आहेत. ...
२००७ साली द्रविडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजमधील विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी साफ निराशाजनक झाली होती. मात्र खेळाडू म्हणून जे शक्य झाले नाही ते प्रशिक्षक म्हणून साध्य करण्याची संधी नियतीने द्रविडला दिली. ...
कुठल्याही सांघिक क्रीडा प्रकारात जेव्हा एखादा संघ विश्वविजयी ठरतो तेव्हा त्या वर्ल्डकपमध्ये महत्वाची भूमिका बजावणा-या खेळाडूंइतकीच त्या संघाच्या प्रशिक्षकाबद्दल चर्चा होते. 2014 सालच्या फुटबॉल वर्ल्डकपचेच उदहारण घ्या. ...
भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली. ...
आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना विश्वचषकातील सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. . ...
आयसीसी अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियानं आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. झिम्बाब्वेनं दिलेलं 155 धावांचं आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पूर्ण केलं आणि द्रविडच्या शिष्यांनी दहा विकेटनं दणदणीत विजय मिळवला. ...