राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
पाकिस्तानमध्ये आफ्रिदी या आडनावाचा फक्त शाहिदचं नाही, तर सध्या तिथल्या लीगमध्ये शाहिन आफ्रिदी हा नेत्रदीपक कामिगरी करत आहे. या शाहिननेच द्रविड यांचे आभार मानले आहेत. ...
मी तर उत्तर प्रदेशच्या गावातून आलो होतो. कसं खायचं, कटलरी कशी वापरायची यांसारख्या कोणत्याच गोष्टी मला माहित नव्हत्या केवळ बॉल कसा मारायचा एवढंच मला माहित होतं. ...
पृथ्वी शॉसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आदर्श आहे आणि 'गुरू' राहुल द्रविडबद्दल त्याच्या मनात आदर आहे. दोन आवडत्या व्यक्तींमध्ये एकाला झुकतं माप देणं खरोखरच खूप कठीण असतं ना? ...