राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
विराट कोहली अँड टीमला नुकत्याच झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. रवी शास्त्री यांच्या कार्यकाळात पुन्हा एकदा टीम इंडियाला आयसीसीची स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं ...
Mithali raj: सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय महिला संघाची कामगिरी म्हणावी तशी समाधानकारक झालेली नाही. या दौऱ्यात मिताली राज हीच केवळ सातत्याने धावा जमवत आहे. ...
India Tour of Sri Lanka : एकाच वेळी दोन भारतीय संघ दोन वेगवेगळ्या दौऱ्यावर आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, तर शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दुसरी फळी श्रीलंकेत दाखल झाली आहे. ...
India tour of Sri Lanka भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) रविवारी आगामी श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार व मुख्य प्रशिक्षक यांचा फोटो पोस्ट केला. ...
India vs Sri Lanka : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या ( Rahul Dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. ...