राहुल द्रविड Rahul Dravid हा भारतीय संघाच्या महान फलंदाजांपैकी एक... कसोटी व वन डे क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील एक खमका फलंदाज म्हणून त्यानं कारकीर्द गाजवली. सोपवलेली प्रत्येक जबाबदारी त्यानं चोख पार पाडली. कसोटीत १३२८८ धावा, वन डेत १०८८९ धावा त्याच्या नावावर आहेत. एकूण ४८ शतकं व १४६ अर्धशतकंही त्यानं झळकावली आहेत. दी वॉल म्हणून प्रसिद्ध असलेला राहुल द्रविड आता टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यानं भारताच्या १९ वर्षांखालील संघाचेही प्रशिक्षकपद सांभाळले आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली भारतानं १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत युवा खेळाडू घडवण्याचं काम त्यानं पाहिलं आहे. Read More
राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...
Rahul Dravid’s Master Act: भारताचा माजी कर्णधार व महान फलंदाज राहुल द्रविडला Mr. Perfect का म्हणतात हे त्यानं नव्या जबाबदारी स्वीकारल्यानंतही सिद्ध केलं. ...
द्रविडनं २०१५ ते २०१९ या कालावधीत भारत अ व १९ वर्षांखालील संघासोबत काम केलं आहे. सध्या तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक युवा खेळाडूंनी राष्ट्रीय संघात आपले नाणे खणखणीत वाजवले आहे ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविड ( Rahul Dravid) विराजमान होणार असल्याचे बीसीसीआयनं बुधवारी जाहीर केले. ...