यंदाच्या वर्षी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेला युवा गायक राहुल देशपांडे, मंजुश्री पाटील आणि सावनी रविंद्र यांच्या स्वरांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे. गेल्या सहा वर्षांपासून लोकमत ‘दिवाळी पहाट’ हा उपक्रम राबवित आहे. ...
अवघ्या महाराष्ट्राच्या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची ओढ लावणारे ख्यातनाम गायक राहुल देशपांडे यांनी शनिवारी सायंकाळी यवतमाळात येऊन यवतमाळ भूमीच्या ताकदीला सलाम केला. येथील कलावंत पोरांना शास्त्रीय संगीत शिकण्याची हळवी सादही घातली. ...