जमिनीच्या अकृषिक वापराकरिता आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी येणा-या अडचणी दूर व्हाव्यात. त्यासंदर्भातील कार्यप्रणालीत सुलभता यावी, या साठी राज्य शासनाने कायद्यात सुधारणा केल्या आहेत. ...
पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) प्रशासनाकडे बसस्थानकांची तसेच त्यावरील सोयी-सुविधांची माहिती उपलब्ध नसल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. सुमारे ७५ बसस्थानकांपैकी प्रशासनाने केवळ १६ स्थानकांची माहिती दिली असून तीही अपुरी आहे. ...
दक्षिणपूर्व अरबी समुद्रात केरळ ते महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने येत्या बुधवारी उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ ...
मागासवर्गीय संवर्गातील जागांसाठी अर्ज करणा-या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा खुल्या संवर्गातील जागांसाठी सुध्दा विचार केला जाईल. शुल्क हा जागांसाठी अडसर समजला जाणार नाही,असे एमपीएससीचे अध्यक्ष व्ही.एन.मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले ...
शास्त्रीय नृत्याचे वैभव, वैविध्य आणि नाविन्य रसिकांसमोर यावे या उद्देशाने प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक वैभव आरेकर व कथक नर्तक सुशांत जाधव यांच्या संकल्पनेतून शहरात सिंधू नृत्य महोत्सव होत आहे. ‘श्रीमंत योगी’ या नाट्याविष्काराने आज महोत्सवाला सुरुवात झाली ...
विसगाव खोयातील पोळवाडी (ता. भोर) येथील दिलीप विठोबा पोळ (वय ५५) हे धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून कालव्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. ...