जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने केलेल्या एअर सर्जिकल स्ट्राईकचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत करण्यात आले. बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, माळीवेस, पेठ भागात फटाके फोडून तरूणांनी भारतमातेचा जयघोष करत भारतीय जवानांना सॅल्यूट केला. ...
पुलवामातील हल्ल्यात शहीद झालेल्या ४२ जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेण्यासाठी भारतीय वायुसेनेने पाक अधिकृत काश्मीरमधील १२ दहशतवादी छावण्या नेस्तनाबूत केल्या. समस्त भारतियांना गर्व वाटावा, अशा या कामगिरीने युद्धात शहीद झालेल्या अमरावती जिल्ह्यातील जवान ...
पुलवामा हल्ल्याच्या बरोबर तेराव्या दिवशी भारतीय वायु सेनेने घरात शिरून आतंकवाद्यांचा खात्मा केला. वारंवार हल्ला करणाऱ्यांना भारतीय सेनेने चांगला धडा शिकविला. या हल्ल्याने शहीदांच्या आत्म्याला शांती मिळेल. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी आहे, ...
भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बहुतांशी दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले ... ...