शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Pravin Darekar criticizes Congress: भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी काँग्रेसचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर मोठा आरोप केला आहे. ...
Mumbai News: उद्धव ठाकरे यांनी आपले सर्व विचार काँग्रेसच्या दावणीला बांधले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे वाघासारखे जगले. मात्र उद्धव ठाकरे हे शेळीसारखे वागत आहेत अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केली आहे. ...