शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
Devendra Fadnavis : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही वर्षे अंडरग्राऊंड मेट्रोचे फोटो काढण्यासाठी मुंबईकरांना दिल्ली किंवा कोलकात्याला जावे लागेल, असे म्हणत ठाकरे सरकारवर टीका केली. ...
Farmer Protest : कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. आजच्या मोर्चात मारुन मुटकून आणलेले लोकं जास्त आहे, शेतकरी कमी आणि घुसवलेले लोकं जास्त होते. ...
pravin darekar : मराठा समाजाचे विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आझाद मैदानात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली व त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ...
pravin darekar : भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देताना भाजपाने सामाजिक संतुलन राखले होते, पण ते या सरकारकडून राखल्याचे दिसत नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रविवारी केली. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या शरद पवारांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे विधान केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...