शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्द्यांवर गाजताना दिसत आहे. सरकार आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगताना दिसतोय. दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडताना पाहायला मिळत आहेत. ...
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातच आता भाज ...
पूजा चव्हाण (Pooja Chavan Suicide Case) मृत्यू प्रकरणात चर्चेत आलेल्या आणि अनेक गंभीर आरोप झालेल्या वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर राजीनामा दिला. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. आता यानंतर रेणू शर्मा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले ...
पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणात मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांचे नाव आल्यापासून ते १५ दिवस गायब झाले होते. त्यानंतर अचानक त्यांनी पोहरादेवी गडावर येऊन शक्तीप्रदर्शन करून त्यांची बाजू मांडली. आता अर्थसंकल्पीय अधिवेशना ...
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर तेथील एका जिल्हा परिषद सदस्याने जाणीवपूर्वक कोरोना पॉझिटीव्ही अहवाल दिला जात असल्याचा आरोप केला आहे. ...