शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे प्रवीण दरेकर Pravin Darekar हे सुरुवातीला राज ठाकरे यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये सक्रीय होते. शिवसेनेतील आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) स्थापना केली. दरेकरही राज ठाकरेंसोबत आले. मनसेच्या तिकीटावर मागाठणे मतदारसंघातून त्यांनी निवडणूकही जिंकली. २००९ ते १४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. २०१४मध्ये त्यांचा पराभव झाला. त्यांनी मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केला. ते मागाठणेमधून तिकीटासाठी आग्रही होते. पण हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं त्यांना उमेदवारी मिळू शकली नाही. दरेकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले. दरेकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. Read More
BJP Pravin Darekar And Shivsena Sanjay Raut Over Anil Deshmukh :अनिल देशमुखांवरून भाजपाने राऊतांना टोला लगावला आहे. संजय राऊत राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यासारखे वक्तव्य करत आहेत असं म्हणत भाजपाने निशाणा साधला आहे. ...
Param Bir Singh Letter: भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ...
भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सवाल. फेब्रुवारीच्या मध्यात अनिल देशमुख कोरोनामुळे नागपुरात त्यांच्या राहत्या घरी क्वारंटाइन होते. त्यामुळे त्यांना कुणी भेटण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं म्हणाले होते पवार. ...
BJP Pravin Darekar Target Thackeray government over MPSC Exam Postponed Decision: सरकारचं कोणत्याही गोष्टीत लक्ष नाही, अनेक दिवसांपासून विद्यार्थी परीक्षांची तयारी करत होते, अशातच ३ दिवस शिल्लक असताना सरकारने अचानक परीक्षा रद्द केल्या, ...