शासनाने प्रवर्गनिहाय घरकुलाचा लाभ देण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखलेल्या आहेत. यात अनुसूचित जातीकरिता रमाई घरकुल योजना असून याचा लाभ घेण्याकरिता लाभार्थी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील असणे बंधनकारक आहे. उमरी (मेघे) ग्रामपंचायतीत मात्र तब्बल २७ लाभार्थी ...
सालेकसा तालुक्यातील एकूण ४१ ग्रामपंचायत अंतर्गत आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत एकूण २०० कुटुंबाना पक्के घर बनवून देण्याचे उद्दिष्ट होते. परंतु २०० पैकी १६४ घरकुलांनाच मंजुरी मिळाली असून बाकीचे लाभार्थी प्रतीक्षा यादीत टाकण्यात आले. ...
लाखांदूर तालुक्यात २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या वर्षात रमाई आवास, शबरी आवास व प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे पाच हजार ८४ घरकुलांचे उद्दिष्ट येथील पंचायत समितीला प्राप्त झाले होते. त्यापैकी जवळपास चार हजार ३८५ घरकुलांना प्रशासकीय मंजु ...
कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व उद्योग आणि व्यवसायांना बंदी घालण्यात आली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही व्यवसाय आणि उद्योगांमध्ये शिथिलता देण्यात आली. यामुळे बांधकाम व्यवसायाचा ...
कमलापूर, व्यंकटापूर, दामरंचा, देचलीपेठा, मरपल्ली आदी भागातील अनेक गावांमध्ये शासनाची घरकूल योजना प्रभावीपणे पोहोचली नाही. परिणामी या भागातील आदिवासी नागरिक कच्च्या घरात वास्तव्य करीत असल्याचे दिसून येते. व्यंकटापूर भागात शिंदीचे छत असलेले घर आहे. अने ...
जनधन खात्यातून महिन्याकाठी केवळ दहा हजार रुपये काढण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अनेक नागरिकांचे खाते जनधनशी जोडले गेले आहे. घरकुलाचा लाभ मिळालेल्या नागरिकांची रक्कमही याच खात्यात टाकली जात आहे. बांधकामाचा काही भाग उभा झाल्यानंतर पहिला आणि द ...
अनुसया रतिराम बावणे (६५) व रतिराम पैकन बावणे (७५) दोन्ही रा. नांदेड अशी लाभार्थी असलेल्या वृद्ध दाम्पत्यांची नावे आहेत. माहितीनुसार, घटनेतील वृद्ध दाम्पत्यांना सन २०१९ - २० यावर्षी शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम मंजूर करण्य ...
ग्रामीण भागात अनेक लाभार्थ्यांना शबरी आवास योजना, प्रंतप्रधान घरकुल योजना, रमाई आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांनी आपले जुने घर पाडुन नवीन बांधकामाला सुरवात केली. दरम्यान, कोरोनाच्या पादूर्भावामुळे देशात संचारबंदी ला ...