नाशिक : शहर व परिसरात उन्हाच्या झळा तीव्र होताच नागरिक उकाड्यापासून बचावासाठी गच्चीवर झोपण्यासाठी जाऊ लागल्याचा गैरफायदा घेत रात्रीच्यावेळी चोरट्यांकडून बंद घरे लक्ष्य करत घरफोड्या केल्या जात आहेत. नाशिक तालुक्यातील नाणेगावात दोन्ही भावंडांचे शेजारी- ...
घोटी : हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गुदामावर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकसह १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी मयूर ...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, गंगामाता वाहन शोध संस्थेचे अध्यक्ष राम उदावंत, उपाध्यक्ष बाबासाहेब बागडे, भरत वाघ, शिवाजी जव्हेरी यांनी वाहनमालकांचा शोध घेतला. ...
पंचवटी : हिरावाडी रोडवर असलेल्या ओमनगर परिसरात रात्री बंगल्याच्या बाहेर शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातून २८ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या भामट्याने ओरबाडून नेल्याची घटना काल शनिवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमाराला घडली. ...
देवळा : बनावट मुद्रांक बनवून झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून याबाबतचा अंमल सातबारा सदरी तात्काळ घेण्यात यावा, असे आदेश चांदवडचे उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले असून बनावट दस्तऐवजाद्वारे हडप केलेली शेतजमीन मूळ मालकाला परत मिळणार ...
सप्तशृंगगड : गेल्या बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न सुटत नसल्याने श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टचे कर्मचारी दि. ७ रोजी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र ट्रस्टला निवेदनाद्वारे देण्यात आले आहे. ...
नाशिक : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत येणाऱ्या अभोणा पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार संशयित परशराम लक्ष्मण गांगोडे यांनी तक्रारदाराकडून १५ हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील बेहड येथे एका सावत्र बापाने आपल्या १४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून नात्याला काळिमा फासला आहे. याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून पिंपळगाव पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार पोस्कोअंतर्गत संशयित आरोपी आकाश सचिन सूर्यवंशी (२ ...