गावठी दारूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या गुदामावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 09:30 PM2021-03-10T21:30:01+5:302021-03-11T01:23:15+5:30

घोटी : हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गुदामावर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकसह १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी मयूर रतन वालझाडे याला अटक करण्यात आली आहे.

Print on the warehouse of materials required for village liquor | गावठी दारूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या गुदामावर छापा

गावठी दारूसाठी लागणाऱ्या साहित्याच्या गुदामावर छापा

Next
ठळक मुद्देघोटीत कारवाई : १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

घोटी : हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळासह नवसागर विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या गुदामावर पोलिसांनी छापा टाकत एका ट्रकसह १९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी घोटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी मयूर रतन वालझाडे याला अटक करण्यात आली आहे.

घोटी शहरातील व्यापारी मयूर रतन वालझाडे (२९, रा. नवनाथनगर) याच्या गुदामावर हातभट्टीची गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा काळा गूळ व नवसागरची विक्री होत असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव, नितीन पाटील यांच्यासह इगतपुरी, घोटी ठाण्यातील पोलीस पथकातील काही निवडक पोलीस पथक तयार करून घोटी येथील गुदामावर छापा टाकण्याचे आदेश देण्यात आले. पोलीस पथकाने खासगी वाहनाने जात घोटी-सिन्नर उड्डाणपुलाजवळ जाऊन पाहणी केली असता तारा प्लाझा इमारतीत एका ट्रकमधून काळ्या गुळाच्या गोण्या गुदामामध्ये उतरवीत असल्याचे निदर्शनास आले. चौकशीत हातभट्टीवर गावठी दारू बनवण्यासाठी लागणारा गूळ असल्याचे निष्पन्न झाले. या घटनेचा अधिक तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक करत आहे.

काळा गूळ; नवसागरचा साठा
पोलिसांनी छापा टाकून काळा गूळ, नवसागर व ट्रक ताब्यात घेऊन जप्त केला. या छाप्यात सहा लाख ८८ हजार किमतीच्या जगरी पावडरच्या ८२५ गोण्या, ९३ हजार किमतीच्या ११३ जगरी पावडरच्या गोण्या, एक लाख ५२ हजार रुपये किमतीच्या १९० गोण्यातील काळा गूळ, ५६ हजार रुपये किमतीच्या बारदानच्या ७० गोण्यांमधील काळा गूळ, ३६ हजार किमतीच्या १२० खराब काळ्या गुळाच्या भेल्या, ५६ हजार किमतीचे १२५ काळ्या गुळाचे बॉक्स, ४४ हजार किमतीचे ७९ नवसागरचे बॉक्स, पाच हजार किमतीचा इलेक्ट्रिक वजन काटा व दहा लाख किमतीचा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे.

Web Title: Print on the warehouse of materials required for village liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.