जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे. ...
गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़ ...
जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याच्या कारणावरुन दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
सेलू तालुक्यातील दुधना नदीपात्रातून १२ टक्के पाणी अचानक कमी झाल्याने हे पाणी गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. निम्न दुधना प्रकल्पामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण केले असताना अचानक पाणी गायब झाल्याने परभणीसह पूर्णा शहराचाही पाणीप्रश्न निर्माण ...
येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना विभागात पंधरा दिवसांपासून कर्मचारीच नसल्याने निराधारांची कामे करणारा हा विभागच निराधार झाला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांच्या समस्यांमध्ये मात्र वाढ झाली आहे. ...