शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले. ...
यावर्षीच्या जून महिन्यात प्रशासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत लावलेल्या ३५ लाख ३५ हजार झाडांपैकी तब्बल १० लाख झाडे जळून गेली आहेत. वृक्षारोपण केल्यानंतर या झाडांना पाणी मिळाले नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ...
परभणी ते मुदखेड या ८१ किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम निम्म्यावर आले आहे. या कामावर मागील तीन वर्षांत २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ...
ऊसतोड टोळीला देण्यासाठी घेतलेले पैसे परत मागू नये म्हणून सोलापूर जिल्ह्यातील ऊस वाहतूकदारास गंगाखेड येथे १६ दिवस डांबून ठेवत मारहाण केल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबर रोजी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जिंतूर तालुक्यातील आडगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ५ लाख ७३ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली ...
शहरातील जमा झालेल्या कचऱ्याचे विलगीकरण करुन तो कचरा डेपोपर्यंत नेऊन टाकण्यासाठी वाहतुकीकरीता महानगरपालिकेने ६ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद मंजूर केली आहे. १४ व्या वित्त आयोगातून मिळणाºया रक्कमेतून यासाठी निधी दिला जाणार आहे. ...
जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे होणारी बैठक अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे धरणातून कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची अनिश्चितता अद्यापही कायम असल्याने शेतकरी पेचात पडला आहे. ...
गोदावरी नदीच्या पात्रात बांधलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून शनिवारी सकाळी ६ वाजता नांदेड शहरासाठी २० दलघमी पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे पात्रात आता केवळ गाळ शिल्लक राहिला असून, गोदावरी काठाचे वाळवंट झाले आहे़ ...