महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या रेशीम योजनेत मनुष्यबळाचा अभाव असल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, नियमित मस्टर निघत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये उदासिनता निर्माण झाली आहे़ परिणामी दुष्काळ ...
११०० के. व्ही. विद्मुत प्रवाहाची मुख्यतार तुटल्याने तालुक्यातील बाणेगाव येथील एका शेतकऱ्याचा एक हेक्टरवरील ऊस जळाल्याची घटना २७ जानेवारी रोजी दुपारी ३.०० च्या दरम्यान घडली. या ऊसाला ठिबक असल्याने ठिबकही जळुन खाक झाले आहे. ...
शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले. ...
शहरातील आठवडे बाजार परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका हॉटेलसह अन्य चार दुकाने जळून खाक झाली. हॉटेल मालक किरकोळ जखमी झाला असून यामध्ये जिवित हानी झाली नाही. या घटनेमुळे जवळपास ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना २ ...
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत जिल्ह्यातील फक्त ८ गावांच्या विकासासाठी तब्बल २५ कोटी ५७ लाख ९० हजार ७६० रुपयांचा आराखडा मंजूर करुनही या संदर्भातील कामे होत नसल्याने आराखड्यात बदल करुन तो १२ कोटी १८ लाख ८१ हजार रुपयांचा करण्यात आला. ...
सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीची हत्या केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने आज सकाळी साडे अकरा वाजता तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. ...