मागील वर्षीच्या उन्हाळ्यामध्ये जिल्हा परिषदेने राबविलेल्या पाणीटंचाई उपाययोजनांचा निधी प्रशासनाला प्राप्त झाला असून, या योजनांच्या खर्चापोटी २ कोटी २३ लाख ६१ हजार रुपये जिल्हा परिषदेला वितरित करण्यात आले आहेत़ ...
जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील साईबाबा माध्यमिक विद्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आली असून, या विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ६०० विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे़ ...
तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़ ...
तालुक्यातील कोनेरवाडी येथील जवान शुभम मुस्तापुरे देश सेवा करताना शहीद झाला; परंतु, शहिद जवानाच्या गावाला जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांचे आतोनात हाल होत आहेत़ ग्रामस्थांना पायपीट करून परिसरातील गावे गाठावी लागत आहेत़ ...
राज्य शासनाने विशेष सहाय्य कार्यक्रमाअंतर्गत विविध निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हे सर्व्हेक्षण पुर्ण झाले नसल्याने तीन महिन्यांचे तालुक्यातील लाभार्थ्यांचे ६६ लाख रुपयांचे मानधन रखडले आहे. यामुळे निराधारांना ...
सर्वसाधारण प्रवर्गातील ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेमधील घरकुलाचा लाभ तात्काळ देण्यात यावा, या मागणीसाठी १३ फेब्रुवारीपासून तालुक्यातील शहापूर येथील ९६ ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ...
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन द्या, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने १३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ‘जॉब दो’ हे आंदोलन करण्यात आले. ...