येथील स्टेशन रोड परिसरातील वस्तू आणि सेवा कर कार्यालया जवळील एक जुने झाड शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यावर आडवे झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे स्टेशन रोड परिसरातील वाहतूक सकाळी १० वाजेपर्यंत खोळंबली होती. ...
खाजगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्यात येणार असून, या संदर्भात स्थापन केलेल्या विशेष समितीने आपला अंतिम मसुदा राज्य शासनाकडे सादर केला आहे. या मसुद्याची सद्यस्थितीत छाननी सुरु आहे. ...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ ...
केंद्र शासनाच्या स्टँडअप इंडिया योजनेतून परभणी जिल्ह्यातील १२ जणांना बँक आॅफ बडोदाने ३ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून, या माध्यमातून सदरील लाभार्थ्यांनी खरेदी केलेल्या गॅस टँकरला आॅईल कंपन्यांनी पहिल्याच दिवसापासून आपल्या सेव ...
ग्रामीण भागात सर्वसामान्य नागरिकांसाठी प्राथमिक आरोग्य महत्त्वाचा दुवा समजला जातो; परंतु, तालुक्यातील बाभळगाव आरोग्य केंद्रात रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ११ जुलै रोजी आरोग्य विभाग स्थानिक पदाधिकारी व ग्रामस्थांम ...
जिल्ह्यातील दलितवस्त्यांमध्ये लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांसाठी ५ कोटी ७६ लाख रुपयांच्या निधीला राज्य शासनाकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली असून त्यातील २ कोटी ३० लाख रुपयांचा निधी जिल्ह्याला वितरित करण्यात आला आहे. ...
पंढरीसी जावे आल्यानो संसारा।’ हा संत तुकाराम महाराजांचा अभंग उभ्या महाराष्ट्राच्या मनीमाणसी घर करुन आहे. याचा प्रत्यय पिढ्यान् पिढ्या आषाढी- कार्तिकीच्या वेळी प्रत्येकाला येत असतो. असाच काहीसा प्रत्यय शुक्रवारी जिल्हाभरात आषाढी एकादशीनिमित्त अबालवृद् ...