समाधानकारक पाऊस नसल्याने अद्यापही दुधना नदीचे पात्र कोरडेठाक आहे. याचाच फायदा वाळू तस्करांनी उचलला असून अनेक भागातून वाळूचा अवैध उपसा करुन वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल प्रशासन मात्र दुर्लक्ष करीत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...
येथील पंचायत समिती अंतर्गत स्वच्छ भारत मिशन योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील २६ गावांमध्ये २ हजार ५९० लाभार्थ्यांना प्रति लाभार्थी ५ हजार रुपये या प्रमाणे १ कोटी २९ लाख रुपये ठेकेदारामार्फत देऊनही ९१४ शौचालयांची कामे अपूर्णच असल्याची बाब समोर आली आहे ...
जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या ६८ इच्छुकांनी गुरुवारी वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाच्या सदस्यांसमोर मुलाखती दिल्या. ...
आर्थिक परिस्थितीमुळे बैलजोडी घेण्यासाठी पैसे नसल्याने दोन मुलीच्या खांद्यावर जू ठेवून पेरणी करणाºया शेतकºयाला भाजपाचे महानगर अध्यक्ष आनंद भरोसे यांनी शुक्रवारी बैलजोडी भेट दिली. ...
जिल्ह्यातील मानवत, पेडगाव येथील बँक आणि विविध ठिकाणची घरफोडी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ आरोपींना गुरुवारी उशिरा अटक केली आहे. या आरोपींकडून अनेक महत्त्वपूर्ण गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ...