परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 11:27 PM2019-08-23T23:27:18+5:302019-08-23T23:27:40+5:30

तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.

Parbhani: 3 pond dryers | परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

परभणी : ७२ तलाव कोरडेठाक

googlenewsNext

विजय चोरडिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : तालुक्यातील मध्यम प्रकल्पासह गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव असे एकूण ७२ छोटे तलाव कोरडेठाक पडले आहेत. येलदरी, सिद्धेश्वर व निवळी या प्रकल्पात पाणीपातळी वाढलेली नाही. त्यामुळे भविष्यात तालुक्याची भीषण दुष्काळाकडे वाटचाल होत आहे.
जिंतूर तालुक्यामध्ये यावर्षी २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. या पावसाची सरासरी ३४ टक्के आहे. ेआजपर्यंत किमान ५३९ मि. मी. पाऊस होणे आवश्यक होते. तालुक्यातील ओढे, नाले अजूनही कोरडेठाक आहेत. जिंतूर तालुक्यामध्ये लघूसिंचन विभागांतर्गत १६ सिंचन तलाव असून २३ पाझर तलाव आहेत. २० गावांमध्ये तलाव आहेत. यापैकी तालुक्यातील एकाही तलावात जेमतेम सुद्धा पाणी नाही. रायखेडा, डोंगरतळा, भोगाव, चामनी, वरुड, हलविरा या तलावात ५ टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. तर ४९ तलावामध्ये ० टक्केही पाणीसाठा नाही. अशीच परिस्थिती लघूपाटबंधारे विभागाच्या तलावांमध्ये आहे. या तलांवामध्ये जेमतेम सुद्धा पाणी नाही. परिणामी भविष्यातील दुष्काळ डोळ्यासमोर दिसत आहे. तालुक्यात मागील ३ वषार्पासून अपुऱ्या पावसामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. त्यातच यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने भविष्यामध्ये बळीराजासह सर्वसामान्य नागरिकांना दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. त्याच बरोबर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच चाºयाचा प्रश्नही गंभीर होणार आहे. याकडे शासन गांभीयार्ने पाहत नाही.
जिंतूर तालुक्यामध्ये येलदरी मध्यम या प्रकल्पामध्ये अद्याप ० टक्के सुद्धा पाणीसाठा नाही. या धरणाखाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची अवस्थाही वाईट आहे. येथेही ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे. ज्या धरणावर येलदरी धरण अवलंबून आहे. त्या खडकपुर्णा धरणात सुद्ध हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आता येलदरी धरण भरणार तरी कसे? असा सवाल उपस्थित होत आहे. मागील ५ वषार्पासून अशीच परिस्थिती आहे. येलदरी धरणामध्ये ० टक्के पेक्षा कमी पाणीसाठा आहे;परंतु, त्यातही १८ टक्के गाळ आहे. त्यामुळे नेमका पाणीसाठा किती? हे पाटबंधारे विभाग सुद्धा सांगू शकत नाही. त्यामुळे तालुकावासिय हैराण झाले आहेत.
पाच शहर २०० गावांना बसणार फटका
४येलदरी व सिद्धेश्वर धरणातून जिंतूर, परभणी, वसमत, हिंगोली, नांदेड या मुख्य शहरासह लगत असणाºया २०० पेक्षा अधिक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. धरणात पाणी नसल्याने भविष्यामध्ये या शहरांना व गावांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.
४याच धरणाच्या पाणीपातळीवर शहराचे भवितव्य अवलंबून आहे. येलदरी, सिद्धेश्वर या धरणावर अनेक गावे व शहरे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. धरणात पाणीसाठा नसल्याने या धरणाचा पाणीसाठा पिण्यासाठी तातडीने राखीव करायला पाहिजे.
४ भविष्यात पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहू शकते. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. त्याच बरोबर जनावरांच्या चाºयाचे व पिण्याच्या पाण्याचे प्रशासनाने नियोजन करणेही आवश्यक आहे.
येलदरीत शुन्य टक्के पाणी
४येलदरी धरणात किमान मृतसाठ्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ० टक्के पाणी येण्यासाठी साधारणत: ४ ते ५ मीटर पाण्याची गरज आहे. ५ मीटर पाणी आल्यानंतर येलदरी धरण ० टक्के होईल. तर खडकपूर्णा धरण ० टक्के होण्यासाठी ३ मीटर पाणी कमी आहे. हे धरण भरल्यानंतर येलदरीत पाणी येईल हीच परिस्थिती येलदरीच्या खाली असणाºया सिद्धेश्वर धरणाची आहे.
पर्जन्यमान घटले
४यावर्षी जिंतूर तालुक्यात केवळ ३४ टक्के पाऊस पडला. सरासरी ८११.१० मि.मी. एवढी नोंद आहे. २१ आॅगस्टपर्यंत २७८.५ मि.मी. एवढा पाऊस झाला. प्रत्यक्षात तो किमान ५३९ मि.मी. होणे अपेक्षित आहे.
४येलदरी धरण क्षेत्रात १५० मि.मी., सिद्धेश्वर धरण क्षेत्रात ४३२ मि.मी. तर खडकपूर्णा धरण क्षेत्रात ३०५ मि.मी. पाऊस पडला आहे. अपेक्षित पर्जन्यमान नसल्याने धरणामध्ये पाणीसाठा वाढू शकला नाही.

Web Title: Parbhani: 3 pond dryers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.