वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़ ...
राज्यात अन्न सुरक्षा कायदा लागू असतानाही परभणी जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी होत नसल्याने हजारो लाभार्थी हक्काच्या रेशनपासून वंचित राहत आहेत़ या पार्श्वभूमीवर शासनाकडे जाब विचारण्यासाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात ...
अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात तात्काळ वाढ करावी, मासिक पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी/बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने बुधवारी परभणी शहरात जेल भरो आंदोलन करण्यात आले़ ...
आयुष्यमान भारत योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रधानमंत्री जनआरोग्य योजना राबविली जात असून, या योजनेत १ लाख ३५ हजार ६८४ लाभार्थ्यांना आरोग्याचे विमा संरक्षण दिले जाणार आहे़ योजनेंतर्गत परभणी शहरातील सुमारे २३ हजार ६१६ कुटुंबियांना पंतप्रधानांकडून आलेले पत्र व ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या ईव्हीएम मशीनच्या प्रथमस्तरीय तपासणी कार्यक्रमात गैरहजर असलेल्या चार तलाठी आणि एका शिक्षकाला जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे़ ...
अधुन-मधून पडणाऱ्या मध्यम पावसाच्या सरीने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान दिले आहे; परंतु, हुमनी अळीच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मोठ्या प्रमाणात पिकांना धोका निर्माण झाला आहे. ...
दोन महिन्यानंतर जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले़ मागील आठ दिवसांत जिल्ह्यात सर्वसाधारण पाऊस झाला़ ६ आॅगस्टपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ३०़२ टक्के इतर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे़ त्यामुळे ६ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६२़१ टक्का पाऊस होण ...
बसस्थानकामधील प्लॅटफॉर्म परिसरातील मोकळ्या जागेत मोठ मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात बसस्थानक परिसर अक्षरश: जलमय झालेले दिसून येत आहे. दररोज ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किमान ३ हजार विद्यार्थिनींसह प्रवाशांना चिखल व पाण्यातून मार्ग काढावा लागत आह ...