परभणी : जुगार, अवैध दारूविक्रीविरूद्ध जिल्हाभरात पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:27 PM2019-09-03T23:27:39+5:302019-09-03T23:28:12+5:30

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जुगार, अवैध दारू विक्री वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी याविरूद्ध मोहीम आखली असून, मंगळवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी धाडसत्र करण्यात आले़ त्यात जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली तर दारुची विक्री करणाºया १८ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे़

Parbhani: Police raids across the district against gambling, illicit liquor sale | परभणी : जुगार, अवैध दारूविक्रीविरूद्ध जिल्हाभरात पोलिसांचे छापे

परभणी : जुगार, अवैध दारूविक्रीविरूद्ध जिल्हाभरात पोलिसांचे छापे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जुगार, अवैध दारू विक्री वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिसांनी याविरूद्ध मोहीम आखली असून, मंगळवारी जिल्हाभरात ठिक ठिकाणी धाडसत्र करण्यात आले़ त्यात जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली तर दारुची विक्री करणाºया १८ जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे़
२ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे़ या काळात जुगार, दारु विक्रीत वाढ होऊन गुन्हेगारी घटना घडण्याची शक्यता असते़ या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिसांनी ठिक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे़ मानवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका शेतामध्ये मनोज उत्तमराव चव्हाण, सुंदर सुदामराव लेंगुळे, लक्ष्मण भीमराव काळे, विकास भाऊराव दहीहंडे, जावेद मन्ना मणियार, मुंजा राजू पांढरे, निशांत श्यामराव धबडगे हे आरोपी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना पोलसांनी या कारवाईत ५ हजार ५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले़ सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिलिंद भिकाजी भोकरे, गौतम तुकाराम आगळे, श्रीकांत पांडूरंग किरवले, पांडुरंग बालासाहेब कांबळे हे चौघे तिर्रट खेळताना पोलिसांना आढळून आले़ नगरपालिकेच्या गोदामाशेजारी हा जुगार सुरू होता़ त्यावेळी पोलिसांनी छापा टाकला़ कारवाईत १ हजार ५० रुपये जप्त करण्यात आले़ गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुभाष भीमा इंगळे, मारोती धोंडीबा पवार, दिलीप नामदेव रखांबे, प्रभाकर तुकाराम घोगरे, बालासाहेब बापूराव वाळके या पाच जणांवर छापा टाकण्यात आला़ गंगाखेड शहरातील तुळजा भवानी नगर येथील मारोती पवार याच्या घरी जुगार खेळला जात होता़ पोलिसांनी ६३० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. २ रोजी जिल्हाभरात १६ आरोपींविरूद्ध कारवाई करीत ६७३० रुपये जप्त करण्यात आले़
पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरूद्धही सोमवारी ठिक ठिकाणी छापे टाकून कारवाई केली आहे़ या कारवाईत बाळू रेवा जाधव, बबन आश्रोबा गायकवाड (रा़लोणी), बापूराव माणिकराव गायकवाड (रा़ पोरजवळा), माणिक नानासाहेब तुरे (भोगाव देवी), वैजनाथ किशनराव आव्हाड (वस्सा), उद्धव खोबराजी चमकुरे, अमीर खान हबीब खान पठाण (परभणी) अभिमन्यू रंगनाथ गायकवाड (टाकळी), बालाजी रंगनाथ पवार (साळापुरी), शिवाजी लक्ष्मण घुगे (इटोली), अंकुश काळे (सेलू), नारायण रामराव घुगे (सावळी), किरण श्रीरंग डंबाळे (परभणी), शैलेश अण्णा (परभणी) यांच्यासह ४ महिला आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात आली़ या छाप्यांमध्ये देशी, विदेशी दारुच्या २८४ बाटल्या आणि ४० लिटर गावठी हातभट्टी दारू पोलिसांनी जप्त केली आहे़
हातभट्टी दारू पकडली
४परभणी- सोनपेठ तालुक्यातील शेळगाव परिसरात चोरून विकली जाणारी हातभट्टी दारू पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी जप्त केली आहे़
४सोनपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या हातभट्टी दारूचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्याआधारे सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील अशोक रामभाऊ घोंगडे यांच्या घरी पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी छापा मारला़ त्यावेळी दारूच्या दोन कॅन जप्त करण्यात आल्या़ २ हजार ७५० रुपयांची ५० लिटर दारू पोलिसांनी या कारवाईत जप्त केली आहे़ या प्रकरणी सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला़

Web Title: Parbhani: Police raids across the district against gambling, illicit liquor sale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.