संजय गांधी निराधार योजनेच्या जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आगामी पाच महिन्यांच्या वेतनाचा प्रश्न निकाली निघाला आहे़ राज्य शासनाने या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी २०२० पर्यंतचे २ कोटी ९३ लाख ६३ हजार १०५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे़ ...
शेतात मळी टाकण्याच्या कारणावरून टँकर चालक आणि मालकामध्ये मारहाण झाल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास परळी नाका परिसरात घडली़ या प्रकरणी ८ जणांविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे़ ...
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने पूर्ण केले असून, अपेक्षित क्षेत्रापेक्षाही नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यात पीक पंचनामे सुरूच आहेत़ ...
परभणी ते मुदखेड या ८१ कि.मी.अंतराच्या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वर्तव ...
शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. ...
निम्म्या पावसाळ्यात ज्या येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तीन जिल्ह्यांची चिंता वाढविली होती. त्याच येलदरी प्रकल्पात १५ दिवसांमध्ये झालेल्या विक्रमी पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न तर निकाली निघालाच. शिवाय चार दिवसांमध्ये येथील जलविद्य ...
जिल्ह्यातील ४४८ पैकी ४४३ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्तीची आढळली असल्याचा अहवाल महसूल विभागाच्या वतीने विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चार गावांचे संपूर्ण कृषीक्षेत्र धरणासाठी व कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळ ...