तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़ ...
बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका पूर्णा येथील परिरक्षक कार्यालयात जमा करुन परत जाणाऱ्या एका केंद्रसंचालकाच्या दुचाकीला २३ फेब्रुवारी रोजी कात्नेश्वर शिवारात अपघात झाला. यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ...
तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी जानेवारी महिन्यातच कोरडी ठाक पडली आहे. शहरासह ग्रामीण भागातील काही गावांची तहान भागविणाऱ्या डोंगरपट्यातील मासोळी मध्यम प्रकल्पातही केवळ ५.४० दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहरासह काही गावांना तीव्र पाणीटंचाईच्या ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ६ कोटी ८८ लाख रुपये खर्च करुन वर्षभरापूर्वी बांधलेल्या बाल रुग्ण विभाग आणि प्रशासकीय इमारतीची एका वर्षातच दुरवस्था झाली असून, नव्याचे नऊ दिवसही या इमारतीचे नाविण्य टिकले नसल्याने रुग्णांची गैरसोय मात्र कायम आहे. ...