पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वर पोहोचली आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, तर अनेक व्यावसायिकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. ...
या कारवाईत सुमारे १ लाख ३३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व चारही प्रभाग समितीमध्ये हा दंड वसूल करण्यात आलेला आहे. ...
कोरोनाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. पोलिसांकडून आवश्यक ठिकाणी नाकाबंदी असून परिमंडळ एकमध्ये २२ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ...
अकाउंटवर पैसे ट्रान्सफर करायचे आहेत, असे सांगून लिंक पाठवून त्याद्वारे एक लाख दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार खारघरमध्ये घडला आहे. आरोपीच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ...
या प्रतिक्रियेची आॅडिओ क्लिप व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मोठ्या प्रमाणात ही क्लिप झळकत असताना, तिच्या सत्यतेबाबत उपमहापौर जगदीश गायकवाड यांना विचारणा केली असता, त्यांनी संबंधित क्लिप माझीच असल्याचे सांगत, पालिका प्रशासनावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. ...
औद्योगिक वसाहतीतील ज्या उद्योगांना उद्योग सुरू ठेवण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अथवा राज्य सरकारच्या संबंधित विभागाने परवानगी दिली आहे, असे उद्योग सुरू ठेवता येणार आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालये सुरू राहणार आहेत. ...