महाराष्ट्रात जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच केंद्रात टीम नरेंद्रमध्ये गेले या चर्चेकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, टीम देवेंद्रमध्ये कोणकोण आहे हे मला माहिती नाही, पण भाजपमध्ये अशी काही टीम मान्य नाही... ...
मंत्रीमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंना स्थान न दिल्याने तिसऱ्यांदा मुंडे भगिनींना भाजपने धक्काच दिला नाही, तर औरंगाबादच्या डॉ. भागवत कराड यांना केंद्रीय राज्यमंत्रिपद देऊन पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा मुंडे समर्थकांत आहे ...
त्याचसोबत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कपिल पाटील, भारती पवार यांचा फोन आला, त्यांना मी शुभेच्छा दिल्या. दिल्लीला बोलावणं आलं तेव्हा भागवत कराड यांनीही मला फोन केला त्यांच्यांशीही माझं बोलणं झालं आहे. ...
गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. ...