एकीकडे डोक्यावर कोसळणारा अवकाळी पाऊस तर दुसरीकडे 'धनंजय मुंडे आप आगे बढो', 'पंकजाताई आप आगे बढो...' अशा जोशपूर्ण घोषणा देत कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
तालुक्यातील लवुळ (क्र. १) येथे पंकजा मुंडे यांची सोमवारी सकाळी ११ वाजता सभा होती. सकाळपासूनच मराठा युवक छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसून होते. पंकजा मुंडे यांचा ताफा चौकात येताच या युवकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना घेराव घातला. ...