Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
रायगड जिल्ह्यात परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका बसला असून, ३ हजार ७८४ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ९५५ महसुली गावे बाधित आहेत. अद्याप काही भागांत सरी कोसळत असल्याने नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...
कोरोनामध्ये नोकरी गेली म्हणून मुंबईला रामराम करून निगडे (ता. दापोली) येथील धोंडू गणपत रेवाळे यांनी गाव गाठले व शेतीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला खरीप हंगामात भात, नाचणी या दोन पिकांपुरती शेती मर्यादित होती. ...
भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...
शासनाने तांदूळ निर्यातीवरील निबंध कमी केले आहेत. यामुळे बाजारभावात ४ ते ७ टक्के वाढ झाली आहे; परंतु यावर्षी नवीन पीक चांगले असून, हे पीक बाजारात आल्यानंतर दर पुन्हा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ...
जून ते सप्टेंबर असा पावसाळ्याचा चार महिन्यांचा कालावधी संपून आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून परतीचा पाऊस काही जाण्याचे नावच घेत नाही. परिणामी जिल्ह्यातील ५० ते ५५ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आलेली भातशेती अडचणीत आली आ ...