राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात शिवसेना केंद्रस्थानी आहे. शिवसेनेत उभी फूट पडली, ठाकरे सरकार गेलं. पण याचा केवळ शिवसेनेला किंवा ठाकरेंनाच नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा नेमका प्लान काय आहे ते समजून घ्या... ...
यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या बैठकीस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संबोधित केले. या बैठकीत महिला संघटना सक्षम करण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ...
Sharad Pawar presidential election: शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यास नकार दिल्यानंतर विरोधकांच्या अडचणी वाढल्या आहेत. अशा स्थितीत शरद पवार यांच्या नावावर विरोधकांचे एकमत असेल तर ते स्वतःच माघार का घेत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...