राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Bihar Election Ajit Pawar Ncp: अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएचा भाग असला, तरी बिहारमध्ये स्वतंत्र निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने १५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत. ...
उद्धवसेनेला मोठी गळती लागली असून, मुंबई महापालिका राखणे ठाकरेंना आव्हानात्मक ठरू शकते. तर, महायुती पूर्ण ताकद लावून शह देण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच मनसेची भूमिका महत्त्वाची ठरू शकते, असे म्हटले जात आहे. ...