राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना पक्षात आणल्यानंतर आता राष्ट्रवादीतील (शरद पवार) एका बड्या नेत्याला पक्षात आणण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या असून त्यांचा पक्षप्रवेश लवकरच होईल, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
सामान्य माणसाशी संपर्क कायम वाढला पाहिजे, त्याला पण नव्याने काय देऊ शकतो यावर विचार केला पाहिजे, यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे नव्याने वाटचाल करताना देखील फार अडचणी येणार नाहीत, असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.... ...