राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
वयाच्या ३८व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले शरद पवार ८४व्या वर्षी रायगडावर पोहोचले, तेव्हा गेल्या साडेचार दशकांत सगळेच संदर्भ आमूलाग्र बदलून गेलेले होते. ...
विकास कामे करणाऱ्या नेतृत्वाला सामान्य जनताच गॅरंटी आहे. नरेंद्र मोदींकडे व्हिजन आहे असं सांगत अजित पवारांनी आपल्या विचाराचा खासदार बारामतीतून पाठवण्याचं आवाहन केले. ...