राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
लवासातील अनियमिततेप्रकरणी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह काही सरकारी अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी जाधव यांनी याचिकेद्वारे केली आहे. ...
शिंदे यांनी किमान १४ तर राष्ट्रवादीने किमान ११ जागांची मागणी केल्याने जागा वाटपाचा फाॅर्म्युला बुधवारी जाहीर होऊ शकला नाही. आता दिल्लीतच अंतिम निर्णय होईल. ...
जागावाटप अंतिम टप्प्यात असून, प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल, असे शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार)कडून सांगण्यात येत होते. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत वंचितच्या मागणीवर तोडगा निघाला नाही. ...
आघाडीमध्ये जागावाटपांची चर्चा सुरू असताना, शिवसेनेला जालना, शिर्डी आणि रामटेक या जागा लढायच्या आहेत. वर्ध्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून दावा केला जात आहे. ...