राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
मविआतील जागावाटपाबाबत अजून कुठलीही चर्चा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा स्ट्राईक रेट बेईमानी आणि गद्दारीत चांगला, त्यांनी पैशावर जागा जिंकल्या असा आरोप संजय राऊतांनी केला. ...
अमोल मिटकरी यांनी वंचित आणि राष्ट्रवादी या युतीचा पर्याय सुचवल्यानंतर राज्यात नवं समीकरण तयार होणार का अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता वंचितने त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. ...
"अद्याप जागावाटपासंदर्भात चर्चाही सुरू झालेली नाही. सर्वांचा वाटा बरोबरीचा आहे. कोण किती जागा लढवेल, हे कोण कुठे जिंकेल यावर अवलंबून आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे." ...
Sharad Pawar News: आपल्याला राज्य हातात घ्यायचे आहे. लोकांची जास्तीत जास्ते काम करा. आता विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...