राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
बारामती नगरपालिका निवडणुकीत उमेदवार बिनविरोध निवडून आणण्यासाठी आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी २० लाख रुपये दिल्याचा आरोप युगेंद्र पवार यांनी केला आहे. ...
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे एकसंघ दिसणाऱ्या महायुतीतील संघर्ष समोर येऊ लागले आहे. राज्यभरात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे दिसत आहे. नेतेही मित्रपक्षावरच लक्ष्य करू लागले आहेत. ...