राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
NCP SP Group MP Supriya Sule News: हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये पाच ते सात मिनिटे चर्चा झाली. यानंतर ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचा सल्ला देणार का? असा सवाल सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. ...
Deputy CM Ajit Pawar News: मनाचा मोठेपणा विरोधकांमध्ये नाही, असे सांगत जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयावरून टीका करणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले. ...
Deputy CM Ajit Pawar On Caste Based Census Decision: केंद्र सरकारचा जातिनिहाय जनगणना करण्याचा निर्णय ऐतिहासिक आणि अत्यंत स्वागतार्ह आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...