दंडकारण्यात दहशत माजवणाऱ्या नक्षलवाद्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माणसं आता नाकारू लागली आहेत. बंदुकीच्या धाकावर थरार माजवू पाहणा-यांना आता थारा द्यायचा नाही, कुठलेही सहकार्य करायचे नाही, असा ठराव घेत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल स्मारक उद्ध्वस् ...
भामरागड तालुक्यातील नेलगुंडा, मिडदापल्ली, गोंगवाडा व पेनगुंडा येथील नागरिकांनी एकत्र येत गुढीपाडव्याच्या दिवशी नक्षल्यांची चार स्मारके उद्ध्वस्त करून आपल्याला शांती व विकास आवश्यक असल्याचे आवाहन नक्षल्यांना केले. ...
तालुक्यातील विसामुंडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी तीन भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी नागरिकांना त्यांच्याकडे असलेली शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे आवाहन केले होते. ...
मुरूमगाव-कटेझरी दरम्यानच्या मार्गावर नक्षल्यांनी लाल रंगाचे बॅनर लावले. विशेष म्हणजे कटेझरी येथीलच एका इसमाची नक्षल्यांनी मंगळवारी दुपारी हत्या केली. ...
छत्तीसगडमधील सुकमा येथील किस्टाराम परिसरात नक्षलवाद्यांनी मंगळवारी मोठा घातपात घडवून आणला होता. त्यात काही सुरक्षा दलाचे जवान शहीद झाले होते. हा हल्ला म्हणजे नक्षलवाद्यांकडून भविष्यात होणाऱ्या मोठ्या हल्ल्याचा इशारा मानण्यात येत आहे. ...