मार्चअखेरीस नवी मुंबई, पनवेलचा पारा ४१ अंशावर गेला असून, याचा परिणाम निवडणुकीच्या प्रचारावरही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीमध्ये प्रचार फक्त सोशल मीडियावरून सुरू आहे. ...
शहरातील नागरिकांनी कमी अंतराच्या प्रवासासाठी खासगी वाहनांचा वापर टाळावा, तसेच तसेच पर्यावरणाला पूरक असलेल्या सायकलींचा वापर करून व्यायामही व्हावा, यासाठी महापालिकेने खासगी संस्थेच्या मदतीने जनसायकल प्रणाली सुरू केली आहे. ...
तुर्भे एमआयडीसी येथून गुन्हे शाखा पोलिसांनी ७३ लाखांचा मद्यसाठा जप्त केला आहे. तेथील गोदामावर अवैधरीत्या साठवण्यात आला होता. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोदाम मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. ...
शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यापैकी काही शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. ...
माथाडी कामगार ही संपत्ती असून ती जपण्याचा प्रयत्न करून कामगारांच्या हितालाच कायम प्राधान्य दिले जाईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये राजकीय फायद्यासाठी संघटनेमध्ये फूट पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही माथाडी नेत्यांनी शुक्रवारी वाशी येथे दिली. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने शहरवासीयांनी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवरायांना मानाचा मुजरा केला, त्याकरिता ३४ हून अधिक ठिकाणी शिवरायांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. ...