दीपोत्सव पर्वातील दोन महत्त्वाचे सण दिवाळी पाडवा आणि भाऊबीज सोमवारी (दि. १६) होणार आहेत. तसेच शासन निर्णयानुसार मंदिरे खुली होणार असल्याने सोमवारी सर्वप्रमुख मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ लागण्याची शक्यता आहे. ...
भारतातील अमेरिकेचे वाणिज्यदूत डेविड जे रॅन्झ हे रविवारी (दि.१५) अचानकपणे सपत्नीक नाशिक दौऱ्यावर आले. त्यांनी पंचवटीतील काळाराम मंदिरासह गोदाघाट व तपोवन परिसराला भेट दिली. यावेळी प्राचीन गंगा-गाेदावरी मंदिर व कुंभमेळ्याविषयी माहितीही त्यांनी जाणून घेत ...
सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावातून जाणाऱ्या जुन्या पुणे महामार्गावरील हॉटेल आदितीजवळ एसटीने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने जखमी झालेल्या एकाचे शनिवारी (दि.१४) नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ...
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी, शासनाचे नियम पाळूनच, साजरी करू या शुभ दीपावली’ याप्रमाणे मुंजवाड (ता. बागलाण ) येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर आहिरे यांनी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळील फलकावर रेखाटनाच्या माध्यमातून आपल्या बोलक्या भावना चित्रातून व ...
मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदाच आपली लक्ष्मी आहे. यावरच आपले कुटुंब अवलंबून असते म्हणत नैताळे येथील शेतकरी संजय साठे दांपत्याने लक्ष्मीपूजनाला कांद्याचे पूजन करत दिवाळी साजरी केली. ...
जगद्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्र ...
येवला तालुक्यातील पुरणगाव येथे दीपावली पाडव्याचे औचित्य साधत गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आला. स्ट्रे कँटल ग्रुप व ग्रामस्थांच्या सहकार्यातून पाडवा पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. यानिमित्त गावातील सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्य ...
येवला तालुक्यातील विखरणी येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने ग्रामपंचायत कार्यालयात दरवर्षी सर्वधर्मीय सामुदायिक लक्ष्मीपूजन करण्यात येते. या दिवशी ग्रामपंचायतने वर्षभरात केलेल्या विकासकांमाचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडला जातो. ...