नांदगाव रोडलगत मिल्लतनगर भागामध्ये असलेल्या रद्दीच्या गुदामाला आग लागल्याने लाखो रु पयांचा रद्दी कागद, पेपर कटिंग मशिनरी, मोटारसायकल जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत. ...
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शहराध्यक्षपदासाठी अनेकांची नावे चर्चेत असली तरी त्याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही त्यातच आता प्रदेशाध्यक्षच बदलल्याने धक्कातंत्राचा वापर होऊन प्रस्थापितांऐवजी नवेच नाव पुढे येऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...
दर पावसाळ्यानंतर महापालिकेची डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढत असते. आताही वीसच्यावर डेंग्यू रुग्णांची संख्या पोहोचली आहे. दुसरीकडे डासांची संख्या प्रचंड वाढली असून, वैद्यकीय विभागाच्या म्हणण्यानुसार घनता चार इतकी आहे. जी धोक्याच्या जवळपास आहे. ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी मावळते अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्याकडून कार्यभार स्वीकारला असून, रविवारी झालेल्या या सभेत विविध अभिनव उपक्रमांचा संकल्प जाहीर करण्यात आला. ...
शिक्षण क्षेत्रामध्ये पैसा, श्रेयवाद आणि राजकारण या गोष्टी द्रोणाचार्य आहेत, तर जे शिक्षण बाजारीकरणाच्या विरोधात काम करीत आहेत, ते सारे एकलव्य आहेत. शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार युवर ...
नाशिक शहर परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...