दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जानोरी ग्रामपंचायतीनेही शिवार रस्ते बंद करून कोरोनाचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून ‘मी कोरोना...घरी थांबाना’ असे नागरिकांना आवाहन केले आहे. ...
इंदिरानगर : संचारबंदी असल्याने नागरिकांनी घरातच थांबावे, असे वारंवार आवाहन करूनही नागरिक रस्त्यावरून फेरफटका मारताना दिसून येत असल्याने अशा नागरिकांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस यंत्रणा अनेक उपाययोजना करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंदिरानगर पोलिसांनी ...
मातोरी : केंद्र सरकारकडून देण्यात येणारा मोफत तांदूळ पोहोचलाच नसल्याने वाटप करणार कसे? असा सवाल उपस्थित करीत रेशनदुकानदारांची पुरवठा विभागाकडेच बोट केल्याने कार्डधारक संभ्रमात पडले आहेत. दुकानदारांनी काहीच माहीत नसेल तर सामान्य कार्डधारकांना उत्तरे क ...
नाशिक : लॉकडाउन काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जंगलांमध्ये गुन्हेगारी कारवाया वाढल्याने वनविभागाच्या नाकीनव आले आहे. वनविभागाकडून दक्षता पथकासह सर्वच गस्ती पथकांना ‘अलर्ट’ दिला गेला आहे. ...
नाशिक : लॉकडाउनच्या काळात अद्याप एकूण १ हजार ७९३ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहरातील विविध भागांतून जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांवर विनाकारण भटकणाऱ्या तसेच संचारबंदी, साथरोग, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांचे उल्लंघन करणा-या एकूण २ हजार ६७ ...
मालेगाव : शहरात एका पाठोपाठ कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना शुक्रवारी (दि. १७) एकाच दिवशी तब्बल १४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. आता मालेगावच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६० वर पोहोचली आहे. ...
नाशिक : मालेगाव येथील १४ जणांना नव्याने कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील २ जणांचा अहवाल येण्यापुर्वीच मृत्यू झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यातील एकाचा १३एप्रिल तर अन्य बाधिताचा शुक्रवार (दि.१७) रोजी ...