वडील बेपत्ता झाल्याची पोलिसांकडे नोंदच नसल्याची माहिती त्यांना समजल्याने शेरॉँन यांनी उत्तर गोव्याहून थेट सातपूरला पोलीस ठाण्यात हजेरी लावून १९९४सालापासून त्यांचे वडील ब्रिगेन्सा बेपत्ता असल्याची कायदेशीर तक्रार शनिवारी दुपारी नोंदविली. ...
बेशिस्त वाहतूकीला शिस्त लागावी व रस्त्यावर होणा-या अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, या उद्देशाने हेल्मेट सक्तीची मोहिम राबविली जाणार असल्याचे नखाते म्हणाले. केवळ हेल्मेट सक्तीवरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे, असे नाही, ...
राग मनात धरून पळशीकर याने ‘तू आताचा शिपुरडा काय मला शिकवितो, अन् पोलीस स्टेशनला घेउन जातो...’असे सांगून चौधरी यांच्या कानशीलात लगावली. दरम्यान, चौधरी यांनी त्वरित वरिष्ठ पोलीस निरिक्षक मंगलसिंह सुर्यवंशी यांना घटनेची माहिती दिली. ...
ज्येष्ठ नागरिक बाविस्कर हे ४ तारखेला बाहेरगावी गेले होते. दोन दिवस त्यांचा बंगला कुलूपबंद होता. या दरम्यान, चोरट्यांनी बंगल्याच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. ...
गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली. ...
कर्तव्य बजावत असताना दुचाकीस्वार, रिक्षाचालकांकडून भर रस्त्यात वाहतूक पोलिसांच्या ‘वर्दी’वर हात घातला जात असून त्यांना धक्काबुक्की व मारहाण करण्यापर्यंत वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांची मजल जाणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ...
दुचाकीस्वारांनी वेगमर्यादेचे पालन करत हेल्मेटचा वापर करून वाहन चालविण्यावर भर द्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वारांच्या डोक्याला जबर मारल लागल्याचे समोर आले आहे. ...
शहरात एकाच दिवसात सहा महिला, मुलींचा विनयभंग झाल्याच्या घटना शुक्रवारी (दि.३) उघडकीस आल्या आहेत. यावरून शहर व परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. ...