धुळे येथून नाशिकला आलेल्या एका संशयित गुन्हेगाराचे अंबड परिसरातून अपहरण झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अपहरण करणाऱ्या संशयितांच्या मागावर आहेत. ...
सिडको परिसरात एकाच दिवशी दोन व्यक्तींनी आत्महत्या केली आहे. यात एका २७ वर्षीय तरुणाचा समावेश असून, त्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत ६१ वर्षीय वयोवृद्धाने स्वत:ला गळफास लावून घेत जीवन संपवले. ...
गावाच्या परिसरात चोरट्यांचा उपद्रव वाढला असून, रात्रीच्या वेळी बंद असलेल्या दुकानांसह गुदामांची कुलपे तोडून गावकऱ्यांच्या घरांनाही लक्ष्य केले आहे. ...
भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदली व पदोन्नती व पदस्थापनेचा आदेश जारी करण्यात आला. लवकरच विश्वास नांगरे पाटील हे सिंगल यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्विकारतील. ...
सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला. ...