अंबड पोलीस व युनिट गुन्हे शाखेने शनिवारी रात्रीच्या सुमारास अंबड भागातील चुंचाळे परिसरात असलेल्या घरकुल योजनेत अचानक कोम्बिंग आॅपरेशन करीत ३० टवाळखोरांसह रेकॉर्डवरील १७ गुन्हेगारांची तपासणी करताना तिघा गुन्हेगारांवरही कारवाई केली. ...
मखमलाबाद परिसरात गँगवार माजविण्याच्या इराद्याने तयारी करून प्रतिस्पर्धींना धमकाविण्यासाठी येत असल्याची कुरापत काढून चौघा संशयितांनी तिघा युवकांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना रविवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास मखमलाबाद बस स्टॅण्ड परिसरात घडली. ...
लग्नात हुंडा दिला नाही, तसेच सासरकडच्या पाहुणे मंडळींचा नीटनेटका पाहुणचार केला नाही आणि लग्नानंतर दोन्हीही मुलीच झाल्या या कारणावरून कुरापत काढून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील सांगवी येथे राहणाऱ्या पतीसह पाच जणांवर ...
कौटुंबिक नैराश्यातून एका ज्येष्ठ नागरिकाने कचराकुंडीत उभे राहून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.१७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मनपा शाळा क्रमांक ५७च्या मैदानाशेजारील एसटी महामंडळाच्या जागेवर घडली. ...
रामवाडीतील कोठारवाडी परिसरात राहणाऱ्या २० वर्षीय युवतीने राहत्या घरी काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ ...