पिंपळगाव, दाढेगाव, वडनेर या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनवर एकाच ठिकाणी तब्बल ५० नळ कनेक्शन करण्यात आल्याने या तीनही गावांचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात असून, हा प्रकार कोणाच्या कृपेने झाला याची चौकशी करण्याची मागणी ग्राम ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने जागेची आखणी करण्यात आली होती; मात्र या जागेवर कोणताही व्यावसायिक व्यवसाय करीत नसल्याने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी ...
येथील प्रभाग क्रमांक २८ मधील नागेश्वर महादेव मंदिर साळुंखेनगर येथील नाल्यामधून गेलेल्या ड्रेनेजलाइनचा पाइप फुटल्याने परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिकेस कळवूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकां ...
महापालिकेतील अतिकामाच्या तणावामुळे जात असल्याची चठ्ठी लिहून गत सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील बेपत्ता सहायक अभियंता रवींद्र पाटील यांचा शोध घेण्यास शहर पोलिसांना यश आले़ तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पोलिसांनी पुण्यातील स्वारगेट ...
खासगी संस्था आणि राजकीय नेते यांच्या ताब्यात असलेल्या शहरातील मिळकती महापालिकेने ताब्यात घेण्यास प्रारंभ केला असून, तीन दिवसांत सव्वाशे मिळकतींना सील करण्यात आल्याचे वृत्त आहे त्यातील सिडको विभागातील सुमारे चाळीस मिळकतींचा समावेश आहे. ...
नाशिक महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी नदीपात्राचे प्रदूषण थांबविण्यासाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना प्रशासनाने कार्यमुक्त केल्याने संतप्त झालेल्या तब्बल ९५ सुरक्षारक्षकांनी शुक्र वारी (दि.१) सकाळी ...
कामाच्या अतिताणामुळे बेपत्ता झालेले अभियंता रवींद्र पाटील सुखरूप परतल्यानंतर आता त्यावरून राजकारण सुरू झाले असून, भाजपातील एका गटाने प्रत्येक विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना काही ताण आहे काय? अशी पृच्छा करण्यास प्रारंभ केला आहे. ...
शहरातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सुमारे अडीच हजार प्रस्ताव दाखल झाले असून, त्यांची पडताळणी करण्यासाठी अवघे नऊ अभियंता शिल्लक असून ते प्रत्यक्ष घटनास्थळी केव्हा मोजमाप करणार? असा प्रश्न केला जात आहे. ...