जिल्हा परिषदेला २०१०-११ साली आयएसओ मानांकन मिळाले होते. ज्या उद्देशासाठी हे मानांकन मिळाले होते तो उद्देश तर आता हरविलाच आहे. नुकत्याच शिक्षण विभागातून शिक्षकांच्या फाईल्स गायब झाल्यानंतर आता जिल्हा परिषदेला मिळालेले आयएसओचे मानांकन व त्यासंदर्भातील ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयातर्फे २०१७ या एका वर्षात एकूण ११० लाच प्रकरणांत यशस्वी सापळे रचण्यात आले. मागील तीन वर्षांपासून या आकड्यात सातत्याने घट होत आहे. २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये यशस्वी सापळ्यामध्ये १८ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती ...
सदर येथील एअर कंडिशिनिंग रेफ्रीजरेशन प्रा.लि. रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग सेंटरला बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखोंचा माल खाक झाला. अग्निशमन विभागाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल चार तास कसरत करावी लागली. ...
पोस्टमास्टर जनरल, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वेगवेगळे प्रतिज्ञापत्र सादर करून स्वत:च्या अख्त्यारितील इमारतींमध्ये दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला. ...
१ जानेवारी २०१८ व त्यानंतर सर्व प्रकरणांवर केवळ अध्यक्षांसमक्ष सुनावणी होईल व आदेशावर पुनर्विचारासाठी दाखल होणाऱ्या प्रकरणांवर अन्य सदस्य सुनावणी घेतील असा निर्णय महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेऊन यासंदर्भात १५ डिसेंबर २०१७ रोजी ठराव पारित केला होत ...
महसूल गुप्तचर संचालनालय आणि अन्न व औषधे प्रशासन विभाग यांनी पाठविलेल्या निकृष्ट सुपारीचे नमुने तपासून दोन आठवड्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अन्न सुरक्षा विभागाला दिला. ...